पान पान झडताना

🍃 *पान पान झडताना*🍂

पर्ण जीर्ण ओझरली
झाड झालयं बोडके
रया गेलीय रानाची
दिसे शिवार रडके

पान पान झडताना
झाला सडा पाचोळ्यांचा
रंग जाहला पिवळा
गर्द हिरव्या मळ्यांचा

थोडी सावली शोधता
होतो जीव कासावीस
रूखरूखत्या उन्हाचा
उठतो खायला दिस

पानी सापडेना कुठे
नुसतेच मृगजळ
दुभांगलेल्या मातीचे
पाया पडत्याती वळ

धारा घामाच्या अंगाला
अन् भाजत्याती पाय
काडी काडी सुकलीय
पशु खातील ते काय ?

व्हावी हिरवी धरती
मना वसंताची आस
चित्र पालटेल सारे
याचेच मनाला भास

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: