देव मनमंदिरी

*देव मनमंदिरी*

झुकलाय तो देव मंदिरी अपेक्षांच्या ओझ्याने
वाकलाय पोशींदाही कर्जखात्याच्या बोझ्याने

त्याच्यापुढती मागण्यांचा डोंगर उभा केलाय
राऊळ सोडून देव केव्हाचाच परागंधा झालाय
दगडच भिजतो सांगा कधी दुधाने तो न्हालाय
का खिजवता त्याला उगा उपवास नि रोझ्याने

खरा देव तो शेतात उन्हामंधी राबराब राबतोय
पोटामधी उठलेला सूळ तो पोटामधीच दाबतोय
अनुदाणाच्या भ्रष्टाचाराने जीव त्याचाही उबतोय
तोही होतो हतबल जरका मारलं वरूण राजाने

देव नाही रे देवळात हे कोणी का नाही समजत
बोल गाडगे बाबांचे का कोणीच नाहीत उमजत
मानव तितुका एकच  का कोणीच नाही जाणत
देव देवळात सांगणारे आज भरतात ढेर्या मजेने

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: