*निवडणुका व कार्यकर्ते*
उनाडला दिसभर
प्रचारात तमक्याच्या
विसरला आईच्या
बाटल्या औषधाच्या
म्हातारा बाप होता
शेवटचे घटके मोजत
ह्योव माञ होता
आजचा दौरा योजत
खाञी मनाला ह्याच्या
तमक्या आमचा निवडणार
भाऊ आमचा यंदा
इतिहास नवा घडवणार
राञंदिवस प्रचार अन्
ते जेवण हॉटेलातलं
अपप्रचार दुसऱ्यांचा
ते पिणं बॉटलातलं
निवडणूकीसाठी तो
मायबापाला विसरला
करताना प्रचार तो
जिभेवरून घसरला
बाप याचा विसावला
निकाल लागायच्या आत
मतदारांनीही नेत्याचा
ह्याच्या टाकला करून घात
तेलही गेल होतं आधी
आता तूप निघून गेलं
फाटक्याच्या हात फक्त
आता धूपाटणच उरलं
का करून घेता धूळधान?
कोणाच्या प्रचारापायी
दोन घास सुखाने खावा
आशीर्वाद देईल माई
पडलेला अन् निवडलेला
उमेदवार शेवटी झाले एक
तोंडघशी पडले कार्यकर्ते
अन् चेहरे पांढरे फेक
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment