🌹 *शब्द*🌹
शब्द तोलून बोलावा
शब्द विंचवाचा डंक
शब्द करतो राजाही
शब्द बनवितो रंक
शब्द आईचा पदर
शब्द आधार पित्याचा
शब्द झुळझुळ पाणी
शब्द घोंघाट रित्याचा
शब्द मधूर भाषण
शब्द फुलांची ओंजळ
शब्द वाचाळता व्यर्थ
शब्द अश्रुंचा ओघळ
शब्द जोडतात मन
शब्द तोडतात मन
शब्द हसवती आणि
शब्द रडवती मन
शब्द भावनांचा अर्थ
शब्द काळजाला स्पर्श
शब्द फुलांचा सुगंध
शब्द फुलवतो हर्ष
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment