🐾संध्याराणी🐾
सुर्य जातो नभापार
सांज उजळून येते
हळूहळू उजेडाला
संध्या कवेमध्ये घेते
पक्षी लपे घरट्यात
चारा पिल्लांना घालती
दुध देण्या वासरांना
गाय गोट्यात धावती
दिवे टिमटिम करी
गाव चिडीचूप होई
पीठ दळताना सख्या
ओव्या जात्यावर गाई
चांदोबाचा नभामधी
मुक्त संचार चालतो
नक्षत्रात चांदण्यांचा
भव्य संसार फुलतो
वारा शीतल वाहतो
अंग अंग रोमांचित
सख्याविन सजनीचे
नाही कशातही चित्त
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment