*मी शेतकरी*
मेघ बरसून गेले
मना भिजवून गेले
पाणी पिवूनिया शेत
आता पेरणीला आले
हाती घेवूनी तिपन
सोनं झाकीतो मातीत
भाग्यावर जगायचं
बळ येतया छातीत
लई लाडाची ही मैना
आली भाकरी घेऊन
पुन्हा लागतो कामाला
थोडा विसावा खाऊन
खातो मिरची भाकर
तोंडी लाववितो कांदा
कृपा वरुण राजाची
हाय जोमात आवंदा
मुठी मुठी भरूनिया
धान्य ओळीत पेरीन
कर्ता करविता देव
त्याच्या हवाली करीन
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment