धग


लक्ष्मण सावंत hindhsher99@gmail.com

10:36 PM (0 minutes ago)

शाळा परिसरात आज शेतोपयोगी लोखंडी औजार बनविणारे(घिसाडी बांधव) कुटूंब  आले होते..आजच्या परिस्थितीशी जोडण्याचा छोटा प्रयत्न 🙏🏻

        🔥 *धग*🔨

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तप्त तापतोय लोह
भाता आणि ऐरण
इथ कुठला चुल्हा?
भात्यावरच जेवण    (जेवण- स्वंयपाक)

नाही भ्रांत जगाची
चंद्र भाकरीची आस
ही मेहनत घामाची
अन् गरमागरम श्वास

ही आग भात्यात
ती पोटामंधी धग
आडकलाय जीव
जरी स्वच्छंद खग

ती घाव घालती
धडधडतोय उर
काळवंडलं तन
काळजात चर्र

भाजला हात जरी
कोणाला सांगतो?
जळत्या भात्यामंधी
ह्योव जीव रांधतो

नोटा बदलण्यात
देश झालाय दंग
ईतभर पोटासाठी
इथं भाजतय अंग

No comments: