*चित्रकाव्य*
वाहणाऱ्या सरीतेचे
दृश्य असे मनोहर
नटलेली धरा अशी
जणू स्वर्ग खरोखर
दोन ललना बसल्या
न्याहाळत सौंदर्याला
शुभ्र पक्षी नभामधी
जसे छेडती वाऱ्याला
गिरी शिखरावरती
शुभ्र हिमाची चादर
सोबतीला इंद्रधनु
रूप दिसते नादर
चहुदिशा हिरवळ
दिसे आनंदात मोर
घ्याया आनंद सृष्टीचा
यावे विसरून घोर
स्वप्नवत सौंदर्य हे
जेव्हा नयनी वसते
सुख मोठे याच्याहून
सांगा कोणते असते
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment