ऋतु वसंत

🍃 *ऋतु वसंत*🍂🎨

मज आवडतो नित्य
राजा ऋतुंचा वसंत
झाडे करितो नवखी
त्यास नाहीच उसंत

येतो  वसंत  ऋतुत
सण प्रितीच्या रंगाचा
कोना कोना भिजवतो
भिन्न रंगाने अंगाचा

पर्ण  पोपटी  हिरवे
होता चैञाची चाहूल
सळसळ त्या पानांची
खाली पडल्या मलूल

कंठ फुटता कोकीळा
स्वर मधुर कानात
पाय सावली शोधती
अंग भाजता उन्हात

किती हर्षे मन सांगू
झाडा फुटता धुमारे
रंग गालाला लागता
अंग अंगाला शहारे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: