🙏🏻 *पुन्हा तुझ्या कुशीत*🙏🏻
मोठेपण विसरून माझे
लहान व्हायचय मला
पुन्हा तुझ्या कुशीत माते
विसवायचं आहे मला||धृ||
किती सुंदर जग होत ना
जेव्हा होतो तुझ्या कुशीत
आता संकटांना तोंड देत
हमसून रडतो मी उशीत
शांत करत नाही कोणीच
करून दोन्ही हाताचा झुला||१||
हसू असायचे चेहऱ्यावर
निरागस आणि निखळ
जो तो आता करू पाहतोय
आपलेच पांढरे उखळ
सांगू कस या बेरकी जगात
आहे जीव माझा गुदमरला||२||
राग नव्हता लोभ नव्हता
नव्हती कशाची मोहमाया
जमावताना माया आता
काळवंडून चाललीय काया
मोकळा श्वास घ्यायचा कसा
समजावणार कोण या फूला||३||
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment