*महिला दिन विशेष*
तुच कन्या तुच माझी बहीण
तुच सखी तुच माझी माय ग
उणे होताच तु आयुष्यातुनी
उरणारय सांग मग काय ग
तुझाच स्पर्श जाहला मजला
कुशीत घेता मी जन्म तुझ्या
थेंब अमृताचे मी तव प्राशिलो
मिळत गेली मज नित्य उर्जा
सदा घडो तव चरणांची सेवा
अजूनी मागणे काहीच नाय ग
बहीण तु माझ्या पाठीवरची
मलाच तरी तु समजून घ्यायची
उब मायेची तुझ्यात मिळायची
अपराध माझे पोटात गिळायची
आनंदी जरी सासरी तुझ्या तू
लागोत माहेरीही तुझे पाय ग
माझ्या आयुष्यभराची तु साथी
दिव्याबरोबर जशी जळते वाती
घट्ट बांधलेत तु सर्वांशीच नाती
उमलत ठेवलीस आपली प्रिती
तुच फुलांची ती ओंजळ माझी
नित्य सुगंध दरवळत जाय ग
इवल्या पावलांनी तु आली घरी
भासे जणू अवकाशातील परी
वर्णु किती आनंद तो माझ्या उरी
लेक माझी लाडाची सर्वांची प्यारी
धावते अंगणात दुडूदुडू अशी की
तुझ्याविना घराला शोभाच नाय ग
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment