*शिवजयंती विशेष काव्य*
*राजांना विनम्र अभिवादन करून या पुष्पांजली अर्पीत*
धसका घेतला मुघलांनी
होता थरथरला काळ
असा होता शुरवीर
माझ्या जीजाऊचा बाळ||धृ||
हाती भवानी मातेची
लखलखती तलवार
तिची पाहूनच धार
दुष्मनांनी घेतली माघार
जयघोष ज्याचा ऐकूनी
पेटून उठते रानमाळ||१||
प्रतापगडाच्या पायथ्याला
अफझलखान होता आला
माझ्या रयतेला त्याने
लय ञास होता दिला
वाघनख्या घालून त्याच्या पोटात
तोडली जीवनाची नाळ||२||
छञपती कुलावंतस
होता रयतेचा वाली
छायेखाली स्वाराज्याच्या
लोक सुखी होती झाली
निर्भयतेने जगत होती
परस्ञी आणि बाळ||३||
नजरेत तेज प्रखर
होता करारी बाणा
दिनदुबळ्यांचा वाली
तो रयतेचा राणा
तुका भजे त्याचे किर्तन
संगे वाजवूनी टाळ||४||
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment