घायाळ हरीणी

*चिञकाव्य-घायाळ हरीणी*

वेढा चहुबाजुंनी माझ्या
नजरेचा त्या दुर्जनांच्या
तुटून पडण्या टपलेल्या
टोळ्या त्या राक्षसांच्या

वार सोसते किती मी
नेहमीच दुष्ट यौवनांचे
घायाळ हरीणी वनी या
बांध फुटती आसवांचे

देहाला माझ्या झोंबती
फेडण्या कातडी लक्तरे
काळ्या नजरांनीच मेले मी
उरलेय हाडमांस फक्त रे

नाहीच कधी जमले
जगणे स्वच्छंदी देहाला
वारा स्वातंत्र्याचा कधी
नाहीच पिवून पाहिला

थकून गेले मी आता
प्रतिकार संपून गेला
घ्या घोट नरडीचा या
तुमच्या हवाली केला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: