*बाप*
माझ्या बापाच्या अंगात
नित्य फाटका ढगला
फाटलेल्या नशिबानं
सारं आयुष्य जगला
नाही वाहन पायात
कसतोय अनवाणी
पीक पिकवी मोत्याचं
काळ्याभोर माळरानी
पाला पाचोळा घेवूनी
छान झोपडी शेकरी
करी चूल्याच्या आगीत
माय ज्वारीची भाकरी
जरी गरीबी जगणं
मन त्याचं मोठं हाय
दारातून कोणीसुद्धा
रित्यापोटी गेलं नाय
नका पैशामधी तोलू
मोल बापाच्या घामाचं
नाही रक्तात हरामी
खातो घास इनामाचं
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment