💧 *घोटभर पाणी*💧
पानी शोधता शोधता
गेले थकून दोन्ही पाय
वर दाह उन्हाचा प्रचंड
घोटभर पाणी कुठं नाय
गेली आटून नदीमाय
विहीर पडली कोरडी
झाडे आपणच तोडली
आता त्याचीच तिरडी
चहू दिशाला भटकंती
एका एका थेबासाठी
हातानेच दुष्काळासंग
जणू बांधल्याती गाठी
झरा पाण्याचा आटला
माना टाकल्या झाडांनी
बहर पानांचा गाळाला
रंग बदलला खोडांनी
किती घालावे साकडे
अशा वांझोट्या ढगांना
एक थेंबही ना पडला
किती विनवावं मेघांना
लय मोल हाय पाण्याचं
पोरांनो घ्या तुम्ही ध्यानी
थेंबही नका वाया घालवू
माफ करणार नाही धरणी
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment