एक सायंकाळ

*नाथसागरावरील सायंकाळ*

चंद्र होता साक्षीला रविराज मावळताना
संथ माझी गोदामाय झुळझुळ वाहताना

पसरलेला अथांग चहूबाजुला निलसागर
विसरलो भान माझे त्यास नयनी भरताना

रोम रोम अंगावरती होते उमटले किती?
जलाशयावरचा वारा या देहाला झोंबताना

नव्हताच राग कधी, ना खंत ही कशाची
लकेर हास्याची गाली क्षितीजापार पाहताना

मावळतीचा भास्कर हाती माझ्या स्थिरावला
राञीच्या गर्द छायेत सार्या जगाला लोटताना

मनोहर किती भासे तो कुशीत शिरताना
याची डोळा देखीला मी जलात डुंबताना

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: