गळाभेट

🏟 *गळाभेट*🔗

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तुरूंगालाही म्हणे
पाझर आज फुटला
कैद्यांनीही मायेचा
ओलावा इथं लुटला

नको फक्त कारावास
हवा सुधारण्या वाव
मिळु द्या किनार्याला
डुंबण्या आधी नाव

झाली आपल्यांची भेट
किती आनंद वाटला
वाळवंटात मायेचा आज
कोमल अंकुर फुटला

बायका मुलांची यांच्या
म्हणे गळाभेट केली
डोळ्यांबरोबर तयांची
ह्रुदयही ओली झाली

झाल नसतं कृष्णकृत्य
तर आज इथं नसतो
सडलो नसतो तुरूंगात
घरी आनंदात असतो

हक्क पुन्हा सुधारण्याचा
प्रत्येकालाच आहे
म्हणूनच गळाभेटीचे इथं
प्रयोजन केलं आहे

आपराधी जरी असेल तो
तरी रक्ताच नात
भेटावया तयाला लेकीच
मन जेलात धावत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*ldsawant.blogspot.in*

तुला सोडून येताना

😢 *तुला सोडून येताना*😢

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तुला सोडून येताना
काळोखल्या होत्या दिशा
चांदण्यांची साथ जरी
एकांताने रडत होती निशा   

तुला सोडून येताना
होतो बेवफा मी जाहलो
किनाऱ्याला भुलूनी
निरर्थक वाहतच राहिलो  

तुला सोडून येताना
रवीही रडला होता
तुला नको दाह म्हणून
क्षितीजात दडला होता

तुला सोडून येताना
मला होते काटे बोचत
तुला मिळावा गुलाब
म्हणून होतो हसून सोसत

तुला सोडून येताना
होता थरारला हात
पडलं भोक काळजात
कसं वर्णु मी शब्दात

तुला सोडून येताना
आठवत आहे ती रात
आणाभाका खाल्लेल्या
तुला देणार होतो साथ

तुला सोडून येताना
वाटलं नव्यानं मी जगेण
नव्हतं वाटलं तुजविना
क्षणा क्षणाला मी मरेण

✍🏻  *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*©hindhsher99@gmail.com*

अपघात

*रेल्वे अपघातावरून प्रभावित*

*अपघात*

✍🏻  *लक्ष्मण द.सावंत*

काळराञ म्हणावी
की काळी पहाट
एक तडा रूळाला
यमसदनाची वाट

कसा म्हणावं यास
सांगा अपघात
साखरझोपेत जणू
झाला हो घात

किती होती स्वप्ने
निजल्या डोळ्यात
छाटली ती कळी
फुलायच्या आत

रस्ता काय रेल्वेरूळ
वेळेवर करा दुरूस्त
नकोच ती टाळाटाळ
सरकार निद्रेत सुस्त

काटा रूतला माझ्या
काळजात खोल
जीव जीवाचा तुटला
मदत मातीमोल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

तु अशी

🌹 🌹

✍🏻 लक्ष्मण द.सावंत

मखमली केस तव
उडत्याती वार्यावर
अडकला हा जीव
चित्त नाही थार्यावर

हस ना जरा गाली
कळी कळी अतुर
सुगंध चहू बाजूला
झाल्या की फितुर

पायातलं ते पैजण
रूणझुण वाजती
मोरनी नाकातली
मजला खुणावती

चंद्राची ती चकोर
भाळी तव सजली
हळूच हसते गाली
सांग कुणा लाजली

नकोस राहू दूर अशी
मज पाशी तु हवी
नजरेत माझ्या तुझी
भरली आहे छवी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
hindhsher99@gmail.com

त्याला फक्त शिकवू द्या

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

पहिले कसा गुरूजींकडे
वेळच वेळ असायचा
दिसभर विद्यार्थ्यांबरोबर
तो रमताना दिसायचा

गमतीजमती शिकवताना
तो ही प्रसन्न असायचा
अशैक्षणिक कामाचा तेव्हा
अंगावर बोजा नसायचा

आता सरल शालार्थानी
त्याला पुरतं वेडलय
प्रगत माझ्या महाराष्ट्रात
अस भयानक घडलय

पेन्शन नाही, पगारामुळेही
घरात वाढू लागले खटके
तरूणपणातच गुरूजींना
आता येऊ लागले झटके

सेल्फी, अॉनलाईन कामात
गुरूजी झालेत दंग
रेंज शोधताना जीवनातील
उडून चाललेत रंग

विविध योजनांचा ढिगारा
अन् वाहू लागतोय पूर
अमलबजावणीत वेळ जातो
शिकवणे राहतय दूर

गुरूजी आहे ज्ञानदाता त्याला
गुरूजीच म्हणून राहू द्या
होईल कल्याण गरीब मुलांचे
त्याला फक्त शिकवू द्या
🙏🏻त्याला फक्त शिकवू द्या🙏🏻

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.केँ.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

ती मध्यराञ

जरा डोकावून पाहिल तर
एकही दंगल घडली नाही
जाळपोळ तर सोडनच द्या
एकही गाडी फोडली नाही

काळा पैसा हाच एकमेव
याच्या मागच कारण आहे
काळ्यापैसावाल्यांची आता
पाचा-वरती धारण आहे

संसदेत जरी गोंधळ झाला
सगळा देश रांगेमधी आहे
काळा पैसा स्वर्ग जरी
काट्यांची ती गादी आहे

इनामदारीने नित्य राहणारे 
झाले आहेत मनातून खूष
देशहीताला पोखरलेली ती
अचुक मारलेली आहे घुस

निर्णायाची ती मध्यराञही
मनातून सुखावली असेल
स्वतंत्र भारतात आता तरी
सामान्य जन आतुन हसेल

जरा सोसून पाहिले तर

✍🏻  लक्ष्मण द.सावंत

निर्णय खरच छान आहे
जरा सोसून पाहिलं तर
काळोखात हरवलो असतो
असचं राहिलं असत तर

होत आहेत कष्ट जरी
उज्वल आहे भवितव्य
नकोच जायला बळी
पुन्हा एकदा एकलव्य

रांगेत उभे राहायची ही
सवय खरेतर नवी नाही
आत्ताच रांग मोडायची
का बरे लागलीय घाई?

सामान्य माणूस खूष आहे
नक्कीच बदल घडत आहे
काळ्याधनावरील नागोबा
सतत वळवळ करत आहे

संघर्षाशिवाय नाही भविष्य
इतिहास बघा सांगत आहे
नव्या दिशेनं घ्या चला झेप
संगत तुमची मागत आहे

गेलेत जरी बळी पन्नास
या लढाईत शहीद झाले
धनदांडग्यांना नाही वाली
दाबे चांगलेच दणाणले

नोटाबंदिला आपण सर्व
हसत हसत सामोरे जाऊ
एक भारत सशक्त भारत
हेच ब्रिद डोळ्याम्होरं ठेवू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
*hindhsher99@gmail.com*

धग


लक्ष्मण सावंत hindhsher99@gmail.com

10:36 PM (0 minutes ago)

शाळा परिसरात आज शेतोपयोगी लोखंडी औजार बनविणारे(घिसाडी बांधव) कुटूंब  आले होते..आजच्या परिस्थितीशी जोडण्याचा छोटा प्रयत्न 🙏🏻

        🔥 *धग*🔨

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

तप्त तापतोय लोह
भाता आणि ऐरण
इथ कुठला चुल्हा?
भात्यावरच जेवण    (जेवण- स्वंयपाक)

नाही भ्रांत जगाची
चंद्र भाकरीची आस
ही मेहनत घामाची
अन् गरमागरम श्वास

ही आग भात्यात
ती पोटामंधी धग
आडकलाय जीव
जरी स्वच्छंद खग

ती घाव घालती
धडधडतोय उर
काळवंडलं तन
काळजात चर्र

भाजला हात जरी
कोणाला सांगतो?
जळत्या भात्यामंधी
ह्योव जीव रांधतो

नोटा बदलण्यात
देश झालाय दंग
ईतभर पोटासाठी
इथं भाजतय अंग

होय मीच तो ज्ञानदाता...

होय मीच तो ज्ञानदाता...


होय मीच तो ज्ञानदाता.....
       चिमुकल्यांचे हात वळवतो
       सुप्त गुण मी बाहेर काढतो
       मीच त्यांचा भाग्य घडविता
       आणिक सत्याचा पुरस्कर्ता
होय मीच तो ज्ञानदाता......
       भविष्य देशाचे माझ्या हाती 
       सुप्त त्यामाझी ईश्वरी शक्ती
       निती संस्कार मी शिकवितो
       मीच तयांचा माता नि पिता
होय मीच तो ज्ञानदाता......
       ज्योती साविञी नि फातिमा
       वारसा तयांचा मीच जपतो
       अंधार वारण्या सरसावलो
       जगाती पसरवण्या मानवता
होय मीच तो ज्ञानदाता......
        ज्ञानाचा आहे मी वारकरी
        शाळाच आहे माझी पंढरी
        मुलेच माझी मुक्ता- तुका
        बनतील ते ज्ञान रचियता
होय मीच तो ज्ञानदाता....

लक्ष्मण दशरथ सावंत 

शिक्षक हीच माझी जात



👊🏻 शिक्षक हीच माझी जात👊🏻
✍🏻 लक्ष्मण द. सावंत

शिक्षक आपुली जात अन्
शिकवणे आपुले कर्म आहे !
आणिक नको जाती युद्ध
भारतीय आपुला धर्म आहे !!
ज्ञानरचनावादाची कास धरा
व्यर्थ विचार हो बाजुला सारा
रंगारंगात विभागू नका तुम्ही
झेंडा फक्त ज्ञानाचा उंच धरा
इवलेशे जीव आपुल्यात रमती
जात कुठं त्यांना सांगा कळते
स्वजातीसाठी तुमचे बोट मग
मोबाइलवर चांगलेच चालते?
विष जातीचे पसरवू नका हो
रोप ज्ञानाचे आता रूजवा की
बंधुभावाला मनामनात पेरून
एकात्मतेची मशाल पेटवा की
रंग विभिन्न हवेतच कशाला
रंग रक्ताचा जर एकच असेल
जातीजातीत विष पसरवणारा
शायद शिक्षक जातीचा नसेल

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.के.प्रा.शाळा पाल,औरंगाबाद
         9403682125
    *ldsawant.blogspot.com*

बडबडगीत

👫बडबडगीत👫
✍🏻 लक्ष्मण द.सावंत
चला चला शाळा भरली
वडाच्या त्या झाडावर
गुरूजी होण्याची वेळ
आली पोपटाच्या पोरावर
शिट्टी मारात त्याने लगेच
कवायत सुरूवात केली
उड्या मारुन मारुन सगळी
प्राणी दमून थकून गेली
विना हातात घेऊन आता
कोकीळा मँडम आल्या
गाण्याच्या भेंड्या मग
तिथ लगेच सुरू झाल्या
कावळे गुरुजींनी रागवत
छडी हातात घेतली
पाढे पाठांतरावरून त्यांनी
मारायला सुरवात केली
छडी दिसताच पक्षांची
किलबील सुरू जाहली
उडू लागले सगळीकडे
वर्गात कोणी न राहिले
✍🏻लक्ष्मण द.सावंत
    प्रा.शि.औरंगाबाद
 
hindhsher99@gmail.com