चारोळी कार्यक्रम

🕯 *दिपप्रज्वलन चारोळी*🕯
✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*

१...
आपल्या आगमनाने अतिथी
आम्ही गेलो आहोत हकखून
व्हावी मांगल्याची सुरूवात
आपण दिपप्रज्वलन करून

२...
आपण लाभले अतिथी
हा आमूचा बहूमाण
करावे दिपप्रज्वलन आता
कराया प्रकाशमाण

३...
समई खुलेल आनंदात
तिला वातीचीही साथ
आपण यावे दिपप्रज्वना
लागावे आपुले हात

४...
दिप दिप पेटूनी इथे
दिपांची दिपमाळ व्हावी
अतिथींना एक विनंती
सुरूवात आपण करावी

५...
उजळून ही ज्ञानज्योती
तो अज्ञान तम दूर जावो
अशा मंगल प्रसंगी ज्योतीला
आपलाच स्पर्श व्होवो

✍🏻 *लक्ष्मण द.सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

🙏🏻🌹➖➖➖🌹🙏🏻
*आभार प्रदर्शन चारोळी*
      *एकूण संख्या-४*

✍🏻 *लक्ष्मण सावंत*

१-
मूल्य आपल्या उपस्थितीचे
आम्ही मनापासून जाणतो
म्हणूनच आम्ही आपले
ह्रुदयापासून आभार मानतो

🙏🏻🌹➖➖➖🌹🙏🏻
२-
आभार मानतो आपले
मी शब्दसुमनांनी
गोड मानून घ्यावे तुम्ही
या समारोप दिनी

🙏🏻🌹➖➖➖🌹🙏🏻
३-
रूणी आहोत आम्ही आपले
देतो शब्द सुमनांचा उपहार
अनमोल वेळ दिलात आम्हासाठी
आज मानतो आपले आभार

🙏🏻🌹➖➖➖🌹🙏🏻
४-
फुलांनी फुलांचे मन
आज पाहा जपले
अशा मंगल प्रसंगी
आभार मानतो आपले
🙏🏻🌹➖➖➖🌹🙏🏻
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

काल आज आणि उद्या

*काल आज आणि उद्या*

प्रत्येक क्षणा क्षणामध्ये पाहा किती बदलले जाते
काल,आज आणि उद्यामंधी किती जग पालटते

एवढीशी परी ती माझी नाजूक पावलांनी आली
अनोळखी नजरेने पाहत हळूच आमुची झाली
पाहता पाहता दुडूदुडू ती घरात लागली चालू
काल बोबडे बोलणारी आज स्पष्ट लागली बोलू
मी तिचा बाप तरी ती माय माझी होऊन जाते
काल, आज आणि उद्यामंधी किती जग पालटते

उन्हाळा किती पाहिलेत मी आज अचूक सांगते
चूका होणारच नाहीत चूकून अशीच ती वागते
हट्ट ही तिचा झालाय कमी कधी वेगळे न मागते
लग्नाचा विषय काढताच हळूच  गाली लाजते
तिच छोटीशी परी मज अजूनही ती छोटीच वाटते
काल, आज आणि उद्यामंधी किती जग पालटते

काल इवलीशी असणारी आज मोठी झाली जरी
उद्या जाईल कदाचित तिच्या स्वतःच्या ती घरी
काल माझी असणारी उद्या राहील का माझी परी
या एकाच विचाराने घर काळजात माझ्या करी
जुनेच राहील का आमच्या दोघांचे अल्लड ते नाते
कल,आज आणि उद्यामंधी किती जग पालटते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माय मराठी

*माझी माय मराठी*

माझी माय मराठी
तिचा अविट गोडवा
सुरूवात वर्षाची
जिचा करतो पाडवा

माझी माय मराठी
ज्ञाना गोडवे गातो
सह्याद्रीचा वारा जिच्या
अंगाखांद्यावर खेळतो

माझी माय मराठी
काळी कणखर माती
नसानसात मराठी अन्
अतुट इथली नाती

माझी माय मराठी
तिची थोर महती
बहिणाबाई ओवीतूनी
तिची गाणी गाती

माझी माय मराठी
मुखामुखात वसते
दिनरात मराठीजण
शेताशेतातूनी कसते

माझी माय मराठी
बोबड्या बोलात रांगते
व्हावे समृद्ध ज्ञानी
अजूनी काही ना मागते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

निवडणूका व कार्यकर्ते

*निवडणुका व कार्यकर्ते*

उनाडला दिसभर
प्रचारात तमक्याच्या
विसरला आईच्या
बाटल्या औषधाच्या
म्हातारा बाप होता
शेवटचे घटके मोजत
ह्योव माञ होता
आजचा दौरा योजत
खाञी मनाला ह्याच्या
तमक्या आमचा निवडणार
भाऊ आमचा यंदा
इतिहास नवा घडवणार
राञंदिवस प्रचार अन्
ते जेवण हॉटेलातलं
अपप्रचार दुसऱ्यांचा
ते पिणं बॉटलातलं
निवडणूकीसाठी तो
मायबापाला विसरला
करताना प्रचार तो
जिभेवरून घसरला
बाप याचा विसावला
निकाल लागायच्या आत
मतदारांनीही नेत्याचा
ह्याच्या टाकला करून घात
तेलही गेल होतं आधी
आता तूप निघून गेलं
फाटक्याच्या हात फक्त
आता धूपाटणच उरलं
का करून घेता धूळधान?
कोणाच्या प्रचारापायी
दोन घास सुखाने खावा
आशीर्वाद देईल माई
पडलेला अन् निवडलेला
उमेदवार शेवटी झाले एक
तोंडघशी पडले कार्यकर्ते
अन् चेहरे पांढरे फेक

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नीरजा

नीरजा माझी भाग्याची

*माझी भाग्याची निरजा*
      *सुखाचा ठेवा*
            *ती*
            *या*
     *नेहमीच अधुर्या*
*माझ्या तिच्यावाचुन भुजा*

*लाडकी निरजा माझी*
    *आनंदाची खाण*
          *नाही*
          *तिला*
       *होऊ देणार*
*कधीही दुःखाची जाण*

*नीरजा तळहातावरील फोड*
      *फुलासम जपली*
             *सुंदर*
             *मधुर*
         *बोबडे बोल*
*ऐकण्यासाठी लागते गोड*

     *नीरजा माझी लेक*
      *गोजीरी सावळी*
            *खुलते*
             *हसते*
       *गालावर खळी*
     *तिच्या पडते सुरेख*

      *माझी एकच इच्छा*
         *गुणवंत व्हावे*
                 *तु*
                *या*
         *सदैव पाठीशी*
*माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.पाल,औरंगाबाद*
*पीन-431111*
© *ldsawant.blogspot.in*

देव मनमंदिरी

*देव मनमंदिरी*

झुकलाय तो देव मंदिरी अपेक्षांच्या ओझ्याने
वाकलाय पोशींदाही कर्जखात्याच्या बोझ्याने

त्याच्यापुढती मागण्यांचा डोंगर उभा केलाय
राऊळ सोडून देव केव्हाचाच परागंधा झालाय
दगडच भिजतो सांगा कधी दुधाने तो न्हालाय
का खिजवता त्याला उगा उपवास नि रोझ्याने

खरा देव तो शेतात उन्हामंधी राबराब राबतोय
पोटामधी उठलेला सूळ तो पोटामधीच दाबतोय
अनुदाणाच्या भ्रष्टाचाराने जीव त्याचाही उबतोय
तोही होतो हतबल जरका मारलं वरूण राजाने

देव नाही रे देवळात हे कोणी का नाही समजत
बोल गाडगे बाबांचे का कोणीच नाहीत उमजत
मानव तितुका एकच  का कोणीच नाही जाणत
देव देवळात सांगणारे आज भरतात ढेर्या मजेने

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पान पान झडताना

🍃 *पान पान झडताना*🍂

पर्ण जीर्ण ओझरली
झाड झालयं बोडके
रया गेलीय रानाची
दिसे शिवार रडके

पान पान झडताना
झाला सडा पाचोळ्यांचा
रंग जाहला पिवळा
गर्द हिरव्या मळ्यांचा

थोडी सावली शोधता
होतो जीव कासावीस
रूखरूखत्या उन्हाचा
उठतो खायला दिस

पानी सापडेना कुठे
नुसतेच मृगजळ
दुभांगलेल्या मातीचे
पाया पडत्याती वळ

धारा घामाच्या अंगाला
अन् भाजत्याती पाय
काडी काडी सुकलीय
पशु खातील ते काय ?

व्हावी हिरवी धरती
मना वसंताची आस
चित्र पालटेल सारे
याचेच मनाला भास

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*